विशेष सभेत निर्णय; ठिकाण ठरवण्यावरून शिवसेना- भाजपात खडाजंगी…
ओरोस ता.२४: राज्यस्तरिय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसील च्या आवारात घेण्यात यावी अशी मागणी करणारी सेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. तसेच प्रदर्शना दरम्यान कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हपसेकर यांना देण्याच्या रणजीत देसाई यांच्या सूचनेला सेनेने विरोध केला. आपण विरोध करत असाल तर मतदान घेऊया अशी शक्कल भाजपच्या सदस्यांनी लढवताच सेनेचा विरोध मावळला. अखेर ६ ते ९ फेब्रुवारी रोजी तेरसे बाबांडे येथे कृषी पशु पक्षी प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली. या प्रदर्शनासाठी ३२ लाख निधीही मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद विशेष सभा अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, सावी लोके, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, समिती सचिव तथा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे, सदस्य प्रदीप नारकर, संजना सावंत, रणजित देसाई, दादा कुबल, नागेंद्र परब, अमर सावंत,अंकुश जाधव, रेश्मा सावंत, रोहिणी गावडे, संजय पडते यांच्यासह अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते