सिंधुदुर्गातील शस्त्र परवानाधारक शेतकऱ्यांची २८ जानेवारीला बैठक…

90
2

ओरोस ता.२४: शासनाने शस्त्र परवाना नूतणीकरणसाठी आकारण्यात येणारे शुल्क १५०० रूपये एवढे केले आहेत.हे शुल्क गोरगरीब बंदूक परवाना धारक शेतकऱ्यांना परवडत नाहीत.त्यामुळे हे शुल्क कमी करण्यात यावेत,तसेच यासंदर्भातील अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारक शेतकरी संघटित होत आहेत.याबाबत चर्चा करण्यासाठी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील ॐ साईं-गणेश हॉल मध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती पंढरीनाथ काटकर यांनी दिली.

श्री. काटकर पुढे म्हणाले,परवाना नुतनिकरणसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे किमान दोन वेळा फेऱ्या माराव्या लागतात.त्यामुळे तालुका तहसील कार्यालयात नुतनिकरन केंद्र सुरु करावे,अशी मागणी करूनही शासन दाखल घेत नसल्याने या सर्व मागण्या बाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.यावेळी शस्त्र परवानाधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन त्यांनी केले.

4