माडखोल ग्रामस्थांचा पाण्यासाठी उपोषणाचा इशारा…

319
2

जिल्हाधिका-यांना निवेदन;मुदतीत पाईपलाईनचे काम पुर्ण न केल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.२४: माडखोल धरणाचे पाणी फेब्रुवारीपूर्वी गावासाठी सोडण्यात येईल,असे आश्वासन दिल्यानंतर सुध्दा संबधित पाईपलाईनचे काम अदयाप पुर्ण झालेले नाही.त्यामुळे वेळेत पाणी न मिळाल्यास ३ फेब्रुवारीला आमरण उपोषण करू,असा इशारा माडखोल ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.याबाबतचे निवेदन येथील लघु पाटबंधारे विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री.कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आले.

दरम्यान यासोबत पाणीवापर संस्थेची मुदत संपलेली असून त्यांची निवडणूक प्रक्रिया तात्काळ लावण्यात यावी,सिंचन पूर्व बैठक तात्काळ घेण्यात यावी,तसेच पाटबंधारे विभागाच्या उदासीन धोरणामुळे कालवा दुरुस्त आलेला ६८ लाखाचा निधी परत जाऊ नये,यासाठी आवश्यक असलेल्या कामाला मुदतवाढ देण्यात यावी,अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी तीन फेब्रुवारीपूर्वीआपण गावासाठी पाणी सोडू,असे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप पर्यंत त्यासंदर्भात कोणतेही नियोजन झालेले नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.परिणामी त्याचा फटका परिसरातील शेतीसह गुरांना बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सरपंच संजय शिरसाट,माजी सरपंच अनिता राऊळ,सहदेव राऊळ, बाबुराव राऊळ, संतोष राऊळ, संजय राऊळ,सुरेश आडेलकर, महेश डेगवेकर,संतोष तेली, नयना राऊळ आदी उपस्थित होते.

4