वेंगुर्ले -नगर भूमापन कामाची २७ जानेवारीपासून चौकशी…

2

वेंगुर्ले ता.२४: येथील नगर परिषद हद्दीतील नगर भूमापन कामाच्या चौकशीचे काम २७ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे.या कामाची जबाबदारी पुणे येथील एका खासगी संस्थेकडे देण्यात आली होती.या संस्थेने केलेल्या मोजणी कामाची तपासणी झाली आता पुढचा भाग म्हणून मिळकत पत्रिका तयार करणे व चौकशी करून सनद घेणे आदी पुढील टप्प्यात जबाबदारी आहे.परंतू वेंगुर्ल्याचे भुमिअभिलेख उपाध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे ही जबाबदारी सावंतवाडी उपअधीक्षकांकडे देण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हा भूमिअभिलेखचे अध्यक्ष विजय वीर यांनी दिली.
दरम्यान यासाठी आवश्यक असलेली चौकशी प्रक्रियेच्या वेळी संबंधितांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

5

4