वेंगुर्ले आगारावरील साई मंदिराचा २३ वा वर्धापनदिन २५ व २६ जानेवारीला…

135
2

वेंगुर्ले : ता.२४
रा. प. वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २३ वा. वर्धापन उत्सव शनिवार दि. २५ जानेवारी ते रविवार दि. २६ जानेवारी २०२० या कालावधीत संपन्न होत आहे.
शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गणेश पूजन व धार्मिक विधीनी सुरुवात होऊन सकाळी ९ वा. वेंगुर्ला शहरात श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक, दुपारी २ वा. श्री विठ्ठल रखुमाई पंचायतन संप्रदाय श्री दादा पंडित महाराज यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ५ वा. ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ७ वा आरती व पालखी मिरवणूक, रात्री ८ वा. ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ भेंडमळा यांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ वा. श्री साईंची पालखी, १० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग प्रयोग ‘अनैतिक जन्म’रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. महारुद्र जप सांगता, सकाळी १० वा. श्री साईबाबांची महापूजा, सकाळी ११ वा. श्री साईंची महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ नंतर महाप्रसाद, दुपारी ३ वाजता भजन, सायंकाळी ५ वा. संत लालाजी महिला फुगडी मंडळ, मठ यांचा फुगडी कार्यक्रम, सायं. ७ वा. महाआरती, रात्री ८ वा. गुणगौरव कार्यक्रम, रात्री ९ वा. साईंची पालखी सोहळा, रात्री १० वा. अक्षर सिंधू कलामंच कणकवली यांचे हृदयस्पर्शी नाटक येरे.. येरे.. पावसा..’तरी आपण कुटुंबीय व मित्र परिवारासह या वर्धापन सोहळ्यास उपस्थित राहून साईबाबांचा हा सोहळा साजरा करण्यात सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन श्री. साई मंदिर देवस्थान समिती व वेंगुर्ले आगार कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

4