बांदा मंडल तालुकाध्यक्षपदी महेश धुरी यांची निवड…

399
2

सावंतवाडी.ता,२५:  येथिल भाजपाच्या बांदा तालुकाध्यक्ष आज अखेर महेश धुरी यांची निवड करण्यात आली.याबाबतची घोषणा माजी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी घोषणा केली.त्यांच्या कडे बांदा इन्सुली,माजगाव,मळेवाड आदी जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आज याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून श्री सारंग यांनी माहिती दिली .
यावेळी तालुकाध्यक्ष संदीप गावडे, सिद्धार्थ भांबुरे, निशांत तोरसकर, धनश्री गावकर, बाबा कोरगावकर, झेवियर फर्नांडिस, प्रसाद अरविंदेकर, विकी केरकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री सारंग म्हणाले सावंतवाडी तालुक्यात तीन भाजपची मंडले करून हे तालुका अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यातील दोघांची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली होती. आता जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या सूचनेनुसार आपण तिसरा तालुकाध्यक्ष नेमत आहोत.
यावेळी धुरी म्हणाले सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी पक्षाकडून आपल्याला देण्यात आले आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पक्षाकडून टाकलेला विश्वास सारखी लावण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.

4