Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहत्ती गेला आणि शेपूट राहिले....माडखोल धरणाची परिस्थिती...

हत्ती गेला आणि शेपूट राहिले….माडखोल धरणाची परिस्थिती…

पाईपलाईनचे काम अर्धवट असल्यामुळे,शेतकरी पाण्यापासून वंचित…

सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता.२५: हत्ती गेला आणि शेपूट राहिले,अशी परिस्थिती तालुक्यातील माडखोल धरणाची झाली आहे.धरणासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर सुद्धा केवळ पाइपलाइन नसल्यामुळे परिसरातील गावे व शेती पाण्यापासून वंचित राहिली आहे.त्यामुळे नळपाणी योजना पुर्ण करण्यासाठी आता ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.ही योजना वेळेत पूर्ण न झाल्यास साडेतीन कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा त्याचा फायदा परिसरातील गावांना होणार नाही.याबाबतची माहिती तेथील ग्रामस्थ लक्ष्मण आडेलकर यांनी दिली.
अशा प्रकारची प्रशासनाची आडमुठी भूमिका राहिली आहे.त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी असून सुद्धा परिसरातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.सावंतवाडी शहरापासून आठ-दहा किलोमीटर असलेल्या माडखोल धरणाच्या नुतनीकरणासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.त्यानंतर हे काम पूर्ण झाले असले तरी २००८ मध्ये झालेल्या पूर परिस्थितीत उध्वस्त झालेल्या पाईप लाईन तशाच अवस्थेत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात धरणात पाणी असतानासुद्धा केवळ पाईपलाईन नसल्यामुळे लोकांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे आता ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असून उदया प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments