Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजप आरवली ग्राम कमिटी तर्फे गवंडळकर व देसाई यांचा सत्कार...

भाजप आरवली ग्राम कमिटी तर्फे गवंडळकर व देसाई यांचा सत्कार…

वेंगुर्ले ता.२५: भाजप आरवली ग्राम कमिटी तर्फे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व माजी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांचा सत्कार करण्यात आला.आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालय येथे आरवली ग्राम कमिटी महिला आघाडी तर्फे “हळदिकुंकू समारंभ” व भाजप आरवली ग्राम कमिटी तर्फे रेकाॅर्ड डान्स व आरोलकर दशावतार यांचा नाटय प्रयोग अशा कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी आरोग्य,शिक्षण सभापती,रेडी.जि.प.परिषद सदस्य प्रितेश राऊळ* यांच्या हस्ते भाजप आरवली ग्राम कमिटी तर्फे वेंगुर्ला नगरपालिकेचे नगरसेवक,व गटनेते,नवनिर्वाचित भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व तालुक्यामध्ये संघटनात्मक काम करुन शत प्रतिशत भाजप,पक्षाला उभारी देणारे माजी तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला आरवली ग्राम कमिटी पदाधिकारी विश्वनाथ शेलटे,राहुल नाईक,विलास सोन्सूरकर,व महिला आघाडी सदस्य सौ.भाग्यश्री चिपकर, सौ.पल्लवी नाईक,सौ.रिया नाईक,सौ.अनिता नाईक,सौ.सायली कुडव,सौ.सावरी शेलटे,सौ.अस्मिता रगजी,सौ.नयना सोन्सूरकर,व बहुसंख्य महिला व ग्रामस्थाची उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन भाजपचे जिल्हा किसान संघाचे उपाध्यक्ष महादेव शेगले व आभार प्रदर्शन आरवली ग्राम कमिटी महिला आघाडी अध्यक्षा रिमा मेस्त्री यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments