वेताळ-बांबर्डे येथील कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

325
2
Google search engine
Google search engine
  1. कुडाळ ता.२५:  येथील वेताळ-बांबर्डे परिसरात असलेल्या नाग्या महादू वस्तीगृहात शिक्षण घेत असलेल्या कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना आज सातेरी युवा चारीटेबल ट्रस्ट,कारीवडे-आपटयाचे गाळू यांच्या माध्यमातून शालेय साहित्य,कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या माध्यमातून या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याचा लाभ तब्बल २० हून अधिक कातकरी मुलांना देण्यात आला.
    दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून कारिवडे आपट्याचे गाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना नेमके कोणत्या पद्धतीने शिक्षण दिले जाते,त्यांचे जीवनमान कसे असते,याविषयी माहिती देण्यासाठी त्यांची भेट करून देण्यात आली.यावेळी या वसतिगृहाचे शिक्षक उदय आईर यांना ट्रस्टच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी सातेरी युवा चारीटेबल ट्रस्ट कारीवडे आपट्याचे गाळू चे अध्यक्ष चंद्रकांत परब, सचिव महेश सावंत, खजिनदार राजेश परब,विनोद परब, सुधीर परब, हनुमंत परब, गोपाल परब, सत्यवान लिंगवत , महेश परब आणि महिला वर्ग,आदि उपस्थित होते.