अनधिकृत एलईडी संदर्भात तातडीची बैठक…

2

 

मच्छीमारांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल…

मालवण, ता. २६ : अनधिकृत एलईडी पर्ससीन मासेमारी विरोधात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गातील अनोख्या मच्छीमार आंदोलनाची कुणकुण प्रशासनाला लागल्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला.
श्रमिक मच्छीमार संघटनेचे छोटू सावजी, बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, गुरु जोशी व इतर मच्छीमारांना जिल्हा पोलिस मुख्यालयात बोलावून घेण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मत्स्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. नियोजनबद्ध लढ्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मधील मच्छीमार समन्वय समितीची रायगड, रत्नागिरी येथील धरणे आंदोलन नियोजनाप्रमाणे सुरु झाली आहेत. तिन्ही जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांचा समन्वय भविष्यातील लढ्यासाठी यशदायी ठरेल अशी आशा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

3

4