बांदा ता.२७: मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये चित्रकला व हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ठाणे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार हेमंत घरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भारतात अनेक ठिकाणी पेंटिंग प्रदर्शने, तसेच विदेशात फ्रान्स, जर्मनी, इस्राईल या देशात चित्रांचे प्रदर्शन व विक्री करणारे तसेच गारमेंट कॅलिग्राफी डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हेमंत घरात यांनी खास विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून अॅबस्टॅक पेंटिंग कसे करावे, कोणकोणते रंग वापरावेत, रंगसंगतीचा वापर कल्पकतेने कसा करावा? याचे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हस्ताक्षर सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टी, कॅलिग्राफी संदर्भातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवली.
यावेळी विद्यार्थ्यांनी याचा मनमुराद आनंद घेतला. तसेच चित्रे काढण्याचा अनुभव देखील घेतला. यावेळी मुख्याध्यापिका मनाली देसाई, कला शिक्षक अमित कुबडे उपस्थित होते.