जखमी सांगली-मिरज येथील;गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान…
आंबोली ता.२७: भरधाव वेगाने आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी पलटी होवून गटारात कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाची बोटे तुटल्याचा प्रकार काल येथे घडला.संदीप शेटये रा.सांगली-मिरज,असे जखमीचे नाव आहे.तर चालक लोकेश्वर अथणी,रा.मिरज हा देखील जखमी झाला आहे.हा अपघात काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास देवसू-कुणकेश्वर येथे घडला.याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले.याबाबतची माहिती पोलीस हवालदार राजेश गवस यांनी दिली.
या गाडीत त्यांच्या ताब्यात असलेल्या ब्रेजा कार पलटी होवून गटारात कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश गवस, सूनील भोगण घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गाडीचा पंचनामा केला आहे.परंतु जखमींना अपघातानंतर तात्काळ गडहिंग्लजला हलविण्यात आल्यामुळे याबाबत पोलीस ठाण्यात कोणी फिर्याद दिली नाही.त्यामुळे याबाबत कोणताही गुन्हा अथवा अपघाताची नोंद दाखल नाही,असे श्री.गवस यांनी सांगितले.