कारिवडे येथे उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…

2

सावंतवाडी.ता,२७: गणेश जयंतीचे औचित्य साधून कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्या वतीने उदया मंगळवार दिनांक २८ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पुढील भजन मंडळ सहभागी होणार ओंकार भजन मंडळ (कोलगाव ), बुवा सर्वेश राऊळ ,सद्गुरू भजन मंडळ भजन मंडळ (वडखोल ),बुवा पुरुषोत्तम परब ,स्वरसाधना संगीत भजन मंडळ (डिगस )बुवा गौरेश चव्हाण , स्वराभिषेक भजन मंडळ (मणेरी )बुवा गीतेश कांबळी , स्वामी समर्थ भजन मंडळ (कलबीस्त )बुवा संतोष धरणे, सनाटेंबमंडळ (सांगेली ) बुवा खेमराज सनाम, स्वरधारा मंडळ (तांबोली )बुवा अमित तांबोळकर अशा सात मंडळांना निमंत्रित केले आहे .या स्पर्धेचे पारीतोषीक वितरण सोहळा स्पर्धा आटोपल्यानंतर मध्यरात्री होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

7

4