कालावल खाडीपात्रातील वाळू लिलावासाठी उद्या मंत्रालयात बैठक…

2

आमदार वैभव नाईक यांची माहिती…

मालवण, ता. २७ : मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रालगत प्रलंबित वाळू साठ्याचा लिलाव करण्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात उद्या दुपारी तीन वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
जिल्ह्यातील वाळूचा लिलाव न झाल्याने वाळू व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. वाळू उपलब्ध होत नसल्याने घरबांधणी तसेच शासकीय कामेही अडकली आहेत. यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले. वाळूचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनीही वाळू लिलावासंदर्भात पाठपुरावा केला. यावर महसूलमंत्री श्री. थोरात यांनी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. उद्या यासंदर्भात दुपारी तीन वाजता मंत्रालयात कालावल खाडीपात्रातील वाळू लिलाव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

1

4