सर्फराज मित्रमंडळाचे आयोजन;अर्चना घारेंच्या हस्ते उदघाटन
बांदा ता.२७:
येथिल सर्फराज खान मित्रमंडळ बांदा यांच्यावतीने आयोजित “बांदा श्री २०२० शरीरसौष्ठव” स्पर्धेचा मानकरी सलग तिसऱ्यांदा तेंडुलकर जीम कुडाळचा संदेश सावंत ठरला तर बेस्ट पोझर गोव्याचा अविध मोरजकर, मोस्ट इम्प्रुव्ह बॉडी बिल्डर गोव्याचा अनुप वेरणेकर ठरला.
डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन व आयबीबीएफ या संस्थेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग व गोवा स्तरावर आयोजित या स्पर्धेतील विविध सहा गटांमध्ये स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बांदा खेमराज प्रशालेच्या मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व श्री हनुमंताच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सरपंच अक्रम खान, माजी सभापती प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, साईप्रसाद काणेकर, जावेद खतीब, श्यामसुंदर मांजरेकर, प्रमुख आयोजक सर्फराज खान, तलाठी फिरोझ खान, प्रवीण देसाई, मधुकर देसाई, उद्योजक आसिफ शेख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्फराज खान, सिद्धेश वेंगुर्लेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. घारे-परब म्हणाल्या की, व्यायाम हा अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने शरिराबरोबरच मनानेही बलवान झाले पाहिजे. तरच तो काळाचे आघात झेलून पुढे जाऊ शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा आकेरकर यांनी केले.
स्पर्धेच्या सहा गटांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. ५५ किलो वजनी गट प्रथम- हमीद सय्यद (गोवा), द्वितीय- राजेंद्र बडबे (कुडाळ), तृतीय- आकाश मळगावकर (गोवा), चतुर्थ- लक्ष्मण तुळसकर (सतार्डे), पंचम- विश्वेश पालव (कुडाळ). ६० किलो वजनी गट प्रथम अमित मेस्त्री (बांदा), द्वितीय- समीर डीचोलकर (गोवा), तृतीय- साईराज बांदिवडेकर (तळवडे), चतुर्थ- अनिष केरकर (गोवा), पंचम- शंकर सिंगनाथ (कुडाळ). ६५ किलो वजनी गट प्रथम- दिनेश गोवेकर (गोवा), द्वितीय- इराना आचार्य (गोवा), तृतीय- प्रवीण रवी (गोवा), चतुर्थ- ओंकार पालवे (कुडाळ). ७० किलो वजनी गट प्रथम- सचिन तुयेकर (गोवा), द्वितीय- अविध मोरजकर (गोवा), तृतीय- सुदर्शन गिरप (गोवा), चतुर्थ- रोहन येजरे (कुडाळ). ७५ किलो वजनी गट प्रथम- अनुप वेरणेकर (गोवा), द्वितीय- साईनाथ कुट्टीकर (गोवा), तृतीय- राजेश हिरोजी (तळवडे), चतुर्थ- प्रसाद नाईक (गोवा). ७५ किलो वरील वजनी गट प्रथम- संदेश सावंत (कुडाळ), द्वितीय- विठ्ठल गोवेकर (गोवा), तृतीय- अजय देसाई (गोवा), चतुर्थ- मारुती मोरे (गोवा)