निकृष्ट दर्जाच्या जिमच्या साहित्यामुळे लाखो रुपये पाण्यात…

2

 

ठेकेदार, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप…

मालवण, ता. २७ : मालवण पालिकेच्यावतीने टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर बसविलेले ओपन जिमचे साहित्य निकृष्ट, चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहे. ठेकेदाराचा निष्काळजीपणा, नगराध्यक्षांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या सार्‍या प्रकारास पालिका प्रशासन व नगराध्यक्ष जबाबदार असल्याची टीका सुदेश आचरेकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर करून दिलेले ओपन जिमचे साहित्य वर्षभर पालिका आवारात उघड्यावर सडत असल्याने ते गंजले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दीड महिन्यांपूर्वी सडून गेलेले हे साहित्य बोर्डिंग मैदान आणि रॉक गार्डन येथे बसविले. याबाबत नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर आम्ही नगराध्यक्षांना कल्पना दिली. जिम उभारलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरण आवश्यक होते. मात्र याकडे नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बसविलेले साहित्य मोडले.
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे जनतेतून निवडून आल्याने त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. एखादे चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या विकासात्मक काम नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले तरी ते त्यावर आवश्यक कार्यवाही करत नाहीत. विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेल्या नगराध्यक्ष कांदळगावकर यांचा पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करणे एवढाच अजेंडा असल्याचा आरोप आचरेकर यांनी केला.

7

4