Saturday, December 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedवादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर पुण्यात बदली...

वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर पुण्यात बदली…

कैदी मृत्यू प्रकरण;प्रशिक्षणासाठी बदली झाल्याचे पाटील यांचे म्हणणे…

सावंतवाडी ता.२७: कैद्याच्या मृत्यूप्रकरणी वादग्रस्त ठरलेले येथील कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांची आज येरवडा कारागृह प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.याबाबतचे आदेश आज सायंकाळी उशिरा कारागृह प्रशासनाला प्राप्त झाले.मात्र आपल्याला प्रशिक्षणासाठी त्याठिकाणी पाठवण्यात आल्याचे श्री.पाटील यांचे म्हणणे आहे.
येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी राजेश गावकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात श्री.पाटील वादग्रस्त ठरले होते.या प्रकरणी कैद्याच्या मृत्यूस ते जबाबदार आहेत.त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे,अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. या मागणीसाठी घंटानाद करण्याचा इशारा देण्यात आला होता. हे आंदोलन प्रजासत्ताक दिना दिवशी करण्यात येणार होते.मात्र खुद्द कारागृह महानगर निरीक्षकांनी आंदोलन करते मनसे नेते यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.त्यानंतर त्यांची आज बदली करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments