सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…

2

सावंतवाडी.ता,२८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी संघाच्या पदाधिका-यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गातील व्यापार क्षेत्राच्या समस्या व अडचणी बाबत श्री ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार विनायक राऊत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महासंघाचे उपाध्यक्ष संजय सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदिश मांजरेकर,वेंगुर्ल्याचे विवेक खानोलकर वैभववाडीचे मनोज सावंत,सदस्य तेजस आंबेकर अविनाश साळुंखे,सुरेंद्र नारकर, संदेश परब, पुंडलिक दळवी,नितीन वाळके, मंदार तोरसकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्गातील व्यापारक्षेत्राच्या समस्यां व अडचणींच्या निराकरणासाठी म्हणून मांडण्यात आलेल्या’ व्यापा-यांच्या सनदे बाबत चर्चा करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आयोजित या बैठकीस केसरकर आवर्जून उपस्थित होते.महासंघाने मांडलेल्या सनदेतील राज्यशासनाशी निगडीत मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी लवकरच संबंधीत खात्यांच्या अधिका-यांच्या उपस्थित बैठक लावण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या.

7

4