बांदा.ता,२८: येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात नुतन गणेश मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यानिमित्त २५ ते २७ जानेवारी या कालावधित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दि. २५ रोजी भव्य मिरवणुकीने वाजतगाजत श्री गणरायाच्या नुतन मुर्तीचे आगमन झाले. रविवार पासून ब्राम्हणवृंदाच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सोमवारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सकाळी १०.०७ च्या मुहुर्तावर मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पुजन तसेच विविध धार्मिक विधी झाले. दुपारी महाआरती होऊन तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त हा संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे.
बांदा श्री पिंपळेश्वर गणपती नुतन मुर्ती स्थापना सोहळा उत्साहात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES