कुंभवडे येथे ३० जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह…

2

वैभववाडी,ता.२८: आदिनाथ वारकरी सांप्रदाय मंडळ कुंभवडे यांच्यावतीने गुरुवार दिनांक ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधन करणार आहेत.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- दररोज पहाटे ४ ते ६ वा.काकड आरती, ८ ते ११ वा.ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ वा. प्रवचन, ७ ते ८ वा.हरिपाठ, रात्री ९ ते ११ वा. हरिकीर्तन नंतर हरिजागर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मार्गदर्शक ह.भ.प .श्री.विनोद महाराज पाटील, काकड आरती ह. भ. प. रमेश महाराज शिंदे ,रमेश तावडे ,हरिपाठ प्रमुख ह. भ. प. दौलत महाराज पाटेकर,राजाराम चव्हाण, राजश्री रावराणे, बाबी कुडाळकर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
दररोज राञी ९ ते ११ वा. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची प्रबोधनात्मक किर्तने होणार आहेत. यामध्ये गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी ह. भ. प. दौलत महाराज पाटेकर (कोळंब ) ३१ जानेवारी रोजी ह. भ. प. विनोद महाराज पाटील (मुंबई) १ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. कांचनताई जगताप महाराज( सामगाव नाशिक) रविवारी दिनांक २ फेब्रुवारी रोजी ह .भ . प. बापुराव महाराज वाघ( पंढरपूर) ३ फेब्रुवारी रोजी ह.भ. प. गजानन महाराज येराडकर ( सातारा) ४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.नवनीतमहाराज कारगणीकर (करगणी जिल्हा सांगली )५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. बाबूलाल महाराज बोरसे (पंढरपूर )गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.बाबूलाल महाराज बोरसे (पंढरपूर) यांची सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे. गवळी म्हणून ह. भ. प. गणेश महाराज( नेर्ले )ह. भ. प.विठ्ठल महाराज पांचाळ, पुंडलिक महाराज पांचाळ, तर मृदुंगमणी म्हणून ह. भ. प .सचिन महाराज पांचाळ ,धोंडू महाराज पांचाळ(जांभवडे) रामचंद्र महाराज सुर्यवंशी( भोम) विजय चव्हाण हे सेवा करणार आहेत .बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी ३ ते ६ वा.या वेळेत कुंभवडे ग्रामस्थ संग मुंबई यांच्यावतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा.असे आव्हान आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ कुंभवडे यांच्यावतीने अध्यक्ष ह. भ. प. उज्वला तावडे व शिवाजी तळेकर यांनी केले आहे.

4

4