अर्चना घारेंचा इशारा;माजी पालकमंत्री केसरकर यांचे नाव न घेता टीका
सावंतवाडी/अजय भाईप.ता,२८: येथील कुटीर रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू. अन्यथा सत्तेत राहून सुद्धा लोकांना चांगली आरोग्य सेवा सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. असा इशारा राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे यांनी आज येथे दिला.दरम्यान आरोग्यसेवा सुधारण्याची जबाबदारी ही स्थानिक आमदारांची असते.मात्र मागच्या काही काळात म्हणावा तसा विकास झालेला नाही असे सांगुन माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सौ.घारे यांनी आज राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज येथील कुटीर रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी पुंडलिक दळवी, संतोष तळवणेकर ,संदीप राणे, रवींद्र म्हापसेकर, नोर्बट मारतीस, आर के सावंत माजी उपसभापती कुडाळ, सुधीर मल्हार, साक्षी वंजारी आदी उपस्थित होते.
सौ. घारे म्हणाल्या या रुग्णालयांमध्ये सावंतवाडी शहरात सोबत ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णांना योग्य सोयी-सुविधा मिळत नाही तसेच रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत आपल्या कानावर तक्रारी आल्या होत्या एकूणच हा विषय आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातला असतात सदर रुग्णालयाची पाहणी करून तशी मागणी आपणाकडे करा अशी सूचना आपणाला दिली होती त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या.
त्या म्हणाल्या रुग्णालयांमध्ये ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तसेच निरो सर्जन आर्थोपेडिक तज्ञ सिटीस्कॅन मशिन डायलेसिस मशीन चा प्रश्न ब्लड बँक विषयी प्रश्न असे अनेक समस्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या एकूणच या समस्यांमुळे रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार मिळत नाही. पाण्याचा प्रश्न मोठा असून यापुढे पाणी टंचाई निर्माण होऊन रुग्णांना गैरसोय होणार आहे. चार डायलेसिस महिला असूनही दोन मशीन वीज कनेक्शन अभावी बंद आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे रुग्णांच्या आरोग्याकडे हेळसांड होत आहे त्यामुळे यासंदर्भात आपण मंत्री श्री टोपे यांना पाठपुरावा करणार असून सदर च्या समस्या तात्काळ मार्गे लावण्याबाबत लक्ष वेधणार आहे.
याठिकाणी यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी लक्ष घडणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने हे प्रश्न आज पासून उभे आहेत एकूणच सदरच्या बाबत आपण आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत मात्र या समस्या न सुटल्यास प्रसंगी सत्तेत असल्याचा विचार न करता लोकांच्या मागण्यासाठी आंदोलनाची भूमिका बजावू तसेच रुग्णालयाच्या सुशोभीकरणाचे काम गेले कित्येक महिने रेंगाळले असून यामुळे रुग्णालयातील रुग्णांना दाटीवाटीने एकच वार्ड मध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे हे काम संबधित प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावे अशा इशाराही सौ. घारे यांनी दिला.