वैभववाडी, ता :२८
रिक्षा संघटना वैभववाडी यांचा १४ वा.वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी वैभववाडी जुना एस.टी.स्टॕंडसमोर आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ७ वा.स्थानिक भजने तर राञी ८ वा.कुमारी आर्या घाडी, गांगेश्वर प्रा.भजन मंडळ तळेरे यांचे भजन.
तर रात्रौ ठिक ९.३० वा.वैभव सावंत बुवा (कुडाळ) विरुध्द विनोद चव्हाण बुवा( दहीसर मुंबई ) यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन रिक्षा संघटना वैभववाडी यांच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर, तालुकाध्यक्ष सचिन रावराणे, सेक्रेटरी महेश आंबेरकर यांनी केले आहे.