शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( महिला क्रीडा मार्गदर्शक) राज्य क्रीडा साहसी पुरस्कार,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) या सन २०१८-१९ वर्षासाठछीच्या पुरस्कारांसाठी दि ५ फेब्रुवारी २०२० रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पुरस्कारांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर अर्ज व माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंस्वाक्षरित प्रमाणपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी पर्यंत सादर करावी. तसेच ऑफलाईन अर्ज दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.