जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल घोषित…

2

ओरोस ता.२८: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती(इ.५वी) परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास शाळेची विद्यार्थिनी कु.स्वधा संदीप लकांबळे ही प्रथम आली तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८वी) परीक्षेत मालवण तालुक्यातील मसुरे नं.१ शाळेचा विद्यार्थी कु.शिशिर सचिन मेहेंदळे हा विद्यार्थी अव्वल आला आहे.

शिक्षक समिती मार्फत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मान्यतेने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी ही परीक्षा २१ जानेवारी रोजी संपूर्ण जिल्हाभरात एकाचवेळी पार पडली.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे अतिशय काटेकोरपणा आणि गोपनीयता राखत ही परीक्षा नियोजनबद्ध घेण्यात आल्याने जिल्हाभरात लक्षवेधी ठरली होती.या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा जिल्हास्तर टॉप टेन यादी पुढीलप्रमाणे-प्रथम कु.स्वधा संदीप लकांबळे,आंबोली नांगरतास, ता.सावंतवाडी (२६६ गुण),द्वितीय कु.विश्वजीत सदानंद पेंडसे,वजराठ नं.१,ता.वेंगुर्ले (२६० गुण),तृतीय कु.कोमल सीताराम लांबर,आडेली नं.१,ता.वेंगुर्ले (२४८ गुण),चतुर्थ कु.काव्या दत्तगुरु चव्हाण,सोनाळी, ता.वैभववाडी (२४६ गुण),पाचवा कु.सई सचिन बेर्डे,जामसंडे नं.१,ता.देवगड (२४४ गुण),सहावा कु.ऋतू प्रशांत भोगले,मसुरे देऊळवाडा, ता.मालवण (२३६ गुण),कु.आर्या अजित राणे,हिंदळे भंडारवाडा, ता.देवगड (२३६ गुण),सातवा कु.अलंकार प्रवीण पाताडे,नांदगाव नं.१,ता.कणकवली (२३६ गुण),आठवा कु.विठ्ठल उदय गवस,कोनाळकट्टा,ता.दोडामार्ग(२२८गुण), नववा कु.दुर्वा दशरथ सावंत,पोखरण नं.१,ता.कुडाळ (२२८ गुण),कु.यशवंत अविनाश भुजबळ,सासोली नं.१,ता.दोडामार्ग (२२८ गुण),दहावा कु.तेज प्रकाश शिंदे,शिरोडा नं.१,ता.वेंगुर्ले (२२६ गुण).पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.प्रथम कु.शिशिर सचिन मेहेंदळे,मसुरे नं.१,ता.मालवण (२०८ गुण),द्वितीय कु.विभास महेश वंजारे,मसुरे नं.१,ता.मालवण (१६८ गुण),तृतीय कु.मानसी संजय दुखंडे,मसुरे नं.१,ता.मालवण (१५८ गुण),चतुर्थ कु.मिलिंद विनय परब,मसुरे नं.१,ता.मालवण (१३६ गुण),पाचवा कु.दिव्या दीपक तोंडवळकर,तोंडवळी वरची,ता.मालवण (१३६ गुण),सहावा कु.वैष्णवी विकास पारकर,पडवे,ता.कुडाळ (१३४ गुण),सातवा कु.दिव्या राजेंद्र सावंत, नावळे धनगरवाडा, ता.वैभववाडी (१३२ गुण),आठवा कु.प्राची लक्ष्मण गुरखे,नावळे धनगरवाडा, ता.वैभववाडी (१२२ गुण).
सदर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक समिती तर्फे करण्यात आले असून या सर्वांना लवकरच होणाऱ्या संघटनेच्या जिल्हा अधिवेशनात गौरविण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी जिल्हाभरात १२५ केंद्रे स्थापन करण्यात आली होती.तर या परीक्षेस दोन्ही इयत्तांची मिळून सुमारे ३५०० विदयार्थी प्रविष्ट झाले होते.अशी माहिती जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी दिली.

7

4