Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा मध्यवर्ती बँका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या...

जिल्हा मध्यवर्ती बँका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या…

 

ओरोस ता.२८:महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ या योजनेत व्यत्यय येवू नये यासाठी राज्य शासनाने राज्यातील २२ जिल्हा मध्यवर्ती बँका व ८ हजार १९४ प्राथमिक कृषि सहकारी संस्था यांच्या पंचवार्षिक निवडणुका जून २०२० पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील सुमारे ७० प्राथमिक सहकारी संस्थांचा समावेश आहे.परिणामी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व ७० प्राथमिक संस्थांचे संचालक यांना मुदतवाढ मिळाली आहे.

Previous article
Next article
वीज पोल डोक्यावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू… कुंभारमाठ येथील घटना… मालवण, ता. २८ : विद्युत पोल उभा करत असताना अचानक दोरी तुटून पोल डोक्यावर कोसळल्याने देवकरण वासुदेव शहारे वय-३५ या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३.३० वाजता कुंभारमाठ येथे घडली. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या पाठीमागे विद्युत रोहित्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचा पोल उभारण्यासाठी आज सकाळी कुडाळ येथून महावितरणच्या ठेकेदाराची माणसे आली होती. दुपारी ते पोल उभे करत असताना अचानक पोलची दोरी तुटली. यात पोल खाली उभ्या असलेल्या देवकरण शहारे या कामगाराच्या डोक्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला तत्काळ गाडीत घालत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती घेतली…
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments