Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावीज पोल डोक्यावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू... कुंभारमाठ येथील घटना... ...

वीज पोल डोक्यावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू… कुंभारमाठ येथील घटना… मालवण, ता. २८ : विद्युत पोल उभा करत असताना अचानक दोरी तुटून पोल डोक्यावर कोसळल्याने देवकरण वासुदेव शहारे वय-३५ या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३.३० वाजता कुंभारमाठ येथे घडली. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या पाठीमागे विद्युत रोहित्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचा पोल उभारण्यासाठी आज सकाळी कुडाळ येथून महावितरणच्या ठेकेदाराची माणसे आली होती. दुपारी ते पोल उभे करत असताना अचानक पोलची दोरी तुटली. यात पोल खाली उभ्या असलेल्या देवकरण शहारे या कामगाराच्या डोक्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला तत्काळ गाडीत घालत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती घेतली…

 

कुंभारमाठ येथील घटना…

मालवण, ता. २८ : विद्युत पोल उभा करत असताना अचानक दोरी तुटून पोल डोक्यावर कोसळल्याने देवकरण वासुदेव शहारे वय-३५ या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३.३० वाजता कुंभारमाठ येथे घडली. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
कुंभारमाठ येथील हॉटेल जानकीच्या पाठीमागे विद्युत रोहित्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचा पोल उभारण्यासाठी आज सकाळी कुडाळ येथून महावितरणच्या ठेकेदाराची माणसे आली होती. दुपारी ते पोल उभे करत असताना अचानक पोलची दोरी तुटली. यात पोल खाली उभ्या असलेल्या देवकरण शहारे या कामगाराच्या डोक्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला तत्काळ गाडीत घालत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments