दीलीप गोडकर; विविध आजारांवर व उपचारांवर होणार विचार मंथन
सावंतवाडी ता.२८: येथील सहयोग ग्राम विकास मंडळ गरड,आणि वैदू वैद्य व वैज्ञानिक वनौषधी आयुर यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडी येथे रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी वैदू,वैद्य व वैज्ञानिक यांचा भव्य जिल्हा मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, या विविध आजार व उपचारांवर विचारमंथन होणार आहे.
अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप गोडकर व अण्णा देसाई यांनी दिली.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.हा मेळावा सकाळी दहा वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला असुन,या मेळाव्यासाठी केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक,आमदार दीपक केसरकर व सावंतवाडी संस्थानच्या राणीसरकार शुभदादेवी भोसले आदींची प्रमुख उपस्थित राहणार आहे.यावेळी जिल्ह्यातील वैदू,वैद्य व वैज्ञानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहनही श्री. गोडकर यांनी केले.
यावेळी सचिव मोतीराम टोपले,प्रा.सुभाष गोवेकर,प्रा.गणेश मर्गज,दशरथ गोडकर,राजेंद्र बिर्जे,कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.