सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्षपदी साक्षी वंजारी यांची निवड…

2

सावंतवाडी ता.२८: सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी साक्षी वंजारी यांची निवड करण्यात आली आहे.निवड राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुष्मिता देव यांनी जाहीर केली.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

सौ.वंजारी या गेली अनेक वर्षे राजकारण व समाजकारणात कार्यरत आहेत.त्यांचा अनेक सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग राहिला आहे.तर महिलांना संघटित करण्याची ताकत त्यांच्यात आहे.त्यांच्या या नेतृत्वाची दखल घेऊन जिल्ह्यातील महिलांना संघटित करण्याची मोठी जबाबदारी आता पक्षाकडून त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

4

4