आंबोली ता.२८: येथील पब्लिक स्कूलमध्ये गुजरात-बडोदा येथून आपल्या मुलाला सोडायला आलेले वडील गेले दोन दिवस बेपत्ता असल्याची घटना घडली आहे.अंकित मुरलीधर चव्हाण (वय.३७),असे त्यांचे नाव आहे.याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नापत्ता चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी गुजरात – बडोदा येथून सावंतवाडी – आंबोली येथील पब्लिक स्कूलमध्ये आठवीत शिकत असणाऱ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आले होते.मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला फोन करुन आपण तातडीने सोमवारी १२ वाजताच्या गुजरात येथे जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसणार असल्याची कल्पना दिली होती. मात्र ते उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र चव्हाण यांनी फोन उचलला नाही.दरम्यान,आपले पती अंकित चव्हाण यांचा मोबाईल फोन चोरीस गेला असल्याची श्नयता वर्तवित त्यांनी आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मोरे यांच्याशी संपर्क साधला.त्यावर मोरे यांनी सकाळी १० वा. मुलाला सोडून ते माघारी लागलीच निघाले अशी माहिती दिली.त्यामुळे सोमवारी दिवसभर वाट बघितली तरीही ते घरी परतले नाही.त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्यात भावोजी अभिजित बंडूराव चव्हाण यांनी सावंतवाडीत दाखल होत.नापताची तक्रार दिली आहे.आंबोली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.