डेगवे मिरेखण शाळेनजीक मृत माकड सापडल्याने खळबळ…

2

 

बांदा,ता.२८:    डेगवे-मोयझरवाडी येथे मिरेखण शाळेनजीक माजी उपसरपंच मधुकर देसाई यांच्या काजू बागायतीत आज मृत माकड सापडले. काजू हंगाम सुरू होत असतानाच मृत माकड सापडल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
डेगवे गावात आतापर्यंत माकडतापाने तीन बळी घेतले आहेत. तसेच ४० हून अधिक माकडताप पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. गेल्या दोन- तीन वर्षात शेकडो माकडे मृत पावली आहेत. त्यामुळे डेगवे गावात माकडतापाची प्रचंड दहशत आहे.
मधुकर देसाई आज सायंकाळी मिरेखण शाळेनजीकच्या आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना बागेत उग्र वास आला. त्यांनी बागेची पाहणी केली असता मृत माकड निदर्शनांस आले. याबाबतची माहिती पत्रकारांनी सावंतवाडी वनपाल पाणपट्टे यांना फोनवरून दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याची माहिती मधुकर देसाई यांनी दिली.

0

4