जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे तांबोळी येथील स्वरधारा मंडळ मानकरी…

133
2
Google search engine
Google search engine

कारीवडेत आयोजन;कोलगाव येथील ओंकार मंडळ द्वितीय

सावंतवाडी.ता,२९: कारिवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तांबोळी येथील स्वरधारा भजन मंडळ ठरले तर द्वितीय क्रमांक कोलगाव येथील ओंकार भजन मंडळाने पटकावला, तृतीय क्रमांकाचे मानकरी कलंबिस्त येथील स्वामी समर्थ भजन मंडळ ठरला माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात पुढील निकाल उत्तेजनार्थ सनाम देव प्रासादिक भजन मंडळ,सांगेली वैयक्तीक पारितोषिक उत्कृष्ट गायक : श्री गीतेश कांबळी,स्वराभिषेक भजन मंडळ, मणेरी,उत्कृष्ट हार्मोनियम वादक:स्वरधारा भजन मंडळ,तांबोळी श्री प्रताप तांबोळकर,उत्कृष्ट पखवाज वादक: सनाम देव प्रासादिक भजन मंडळ,सांगेली श्री भावेश राणे,उत्कृष्ट तबला वादक:सनाम देव प्रासादिक भजन मंडळ,सांगेली श्री ओंकार तळवणेकर,उत्कृष्ट झांज वादक:स्वरसाधना भजन मंडळ, डिगस श्री सिद्देश चव्हाण,उत्कृष्ट कोरस :स्वरसाधना भजन मंडळ, डिगस परीक्षक म्हणून दिप्तेश मेस्त्री पखवाज वादक मनीष तांबोस्कर यांनी काम पाहीले.