कणकवली ता.२९: सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अध्यक्षपदी माजी आमदार राजन तेली यांची आज नियुक्ती करण्यात आली.श्री तेली हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व विशेषता कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचे चांगले नेटवर्क आहे.त्यामुळे त्याचा फायदा आता भविष्यात भाजपा वाढवण्यासाठी होणार आहे.
ही निवड आज जिल्हा कार्यकारणीच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी श्री.तेली यांच्या नावाची घोषणा केली.श्री.तेली यांच्या नावाचे सावंतवाडी,कणकवली, देवगड येथील तालुका अध्यक्षांची सूचक अनुमोदक असलेले दोन अर्ज निरीक्षक श्री.चव्हाण यांच्या कडे देण्यात आले होते.त्या नुसार ही निवड दुसरा कोणीही इच्छुक नसल्याने बिनविरोध करण्यात आली.
यावेळी कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार,अतुल काळसेकर,शरद चव्हाण,प्रमोद रावराणे,जि.प.अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,युवा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,राजू राऊळ,प्रभाकर सावंत, जयदेव कदम,संध्या तेरसे,देवगड तालुक अध्यक्ष संतोष किंजवडेकर,रवींद्र पाळेकर ,वैभववाडी तालुकाअध्यक्ष नाशिर काझी,कणकवली तालुका अध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,मालवण तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, वेंगुर्ले सुहास गवंडळकर,यांच्या सह १३ मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.