निशांत तोरसकर;भाजपा प्रवक्ते माधव भंडारीची उपस्थिती…
सावंतवाडी ता.२९: सी.ए.ए आणि एन.आर.सी कायद्यासंदर्भात समाज प्रबोधनासाठी येथे होणाऱ्या समर्थ यात्रा कार्यक्रमात काही कारणास्तव बदल करण्यात आले असून १ फेब्रुवारी रोजी होणारा हा कार्यक्रम सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे,अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निशांत तोरसकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
श्री तोरसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता समर्थन यात्रेने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.येथील शिव उद्यानातून ही समर्थ यात्रा सुरू होणार असून सालईवाडा,मिलग्रीस हायस्कूल येथून गांधी चौक मार्गे फिरणार आहे. तर अकरा वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सी.ए.ए आणि एन.आर.सी कायद्या संदर्भात नागरिकांच्या जनजागृतीसाठी व या कायद्याविषयी अधिक माहितीसाठी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत यावेळी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने श्री.तोरसकर,स्वागत नाटेकर व सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे.