विकास सावंत; पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा दिला शब्द
कुडाळ/मिलिंद धुरी ता.२९: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पदाधिकारी तथा उमेदवारी जाहीर झालेल्या हेमंत उर्फ काका कुडाळकर यांना आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून पक्षात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी पत्र प्रसिद्धीस दिले आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की,श्री.कुडाळकर यांच्या बाबत विधानसभा निवडणूक पक्षातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली होती.कुडाळकर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची व जिल्हाध्यक्ष या नात्याने माझी भेट घेऊन आपण पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारताना पक्षाला अडचण होईल किंवा पक्षाला कमीपणा येईल,अशी भूमिका कधीच घेतली नव्हती.त्यामुळे यात कोणताही समज अथवा गरज असेल तर मी पक्षाकडे दिलगिरी व्यक्त करीत आहे.मला पक्षांमध्ये पुन्हा सहभागी करून घेण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यानुसार पक्षाकडून करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे.असे श्री.सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.