वेतोरे भिवजीवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न….

2

विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्वल करावे : समिधा नाईक…

वेंगुर्ले,ता.२९: शालेय अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ समिधा नाईक यांनी केले.
वेंगुर्ले तालूक्यातील वेतोरे भिवजी वाडी शाळेच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात सौ. नाईक बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकरवाडी सरपंच संदीप चीचकर उपस्थित होते. मंगळवारी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ. सावि लोके, वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी कुबल, सौ. स्मिता दामले, उपसरपंच दिनकर पालव, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य गजानन धुरी, अर्चना वराडकर, उमेश करंगुटकर, शाळेसाठी अमूल्य जमीन दात्या जयश्री राहुळ उपस्थित होत्या.
शालेयव्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर मुख्याध्यापक दत्ताराम तवटे यांनी आभार मानले.

1

4