Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर....

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर….

सिंधुदुर्गनगरी ता.२९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी आठ ग्रामसेवकांची त्यांनी सन २०१८-१९ मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांची नावे जिप अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहिर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिप अध्यक्ष समिधा नाईक बोलत होत्या. यावेळी जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके, महिला व बाल विकास समिती सभापती माधुरी बांदेकर, ग्रापच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटिल आदि उपस्थित होते.

ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहनिमान उंचावन्यास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ग्रामसेवकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. एका गटातून एक या प्रमाणे आठ तालुक्यातून प्रत्येकी एक प्रमाणे ८ प्रस्तावांची गुणांकानुसार सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामसेवकांची पुरस्कार निवड समितीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड केली असल्याची माहिती जिप अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली.

यात दोडामार्ग तालुक्यातील लक्षमण नरसिंगराव पवार (ग्रामसेवक विर्डि), देवगड- शिवराज धारु राठोड (ग्रामसेवक बापार्डे), कणकवली- वर्षा आनंद जाधव (ग्रामसेवक करंजे), मालवण- अशोक गोपीचंद पाटिल (ग्रामसेवक चौके), कुडाळ- अनंत नामदेव गावकर (ग्रामविकास अधिकारी), वेंगुर्ला- मंगेश एकनाथ नाईक (ग्रामसेवक भोगवे/चिपी), वैभववाडी- उमेश फकीरा राठोड (ग्रामसेवक मांगवली-एडगाव) तर सावंतवाडी बापूसाहेब निवृत्ती फुंदे (ग्रामसेवक तळवणे) या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना सन्मान पूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही जिप अध्यक्षा समिधा नाईक यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments