तारकर्ली पर्यटन केंद्रात उभारलेल्या उपहार गृहाचे ३०रोजी लोकार्पण…

2

ओरोस.ता,२९: तारकर्ली येथील पर्यटन केंद्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उभारलेल्या उपहार गृहाचा लोकार्पण सोहळा 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पर्यटन विकास अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यु काळे यांनी पर्यटन निवासातील उपहारगृहे महामंडळाच्या माध्यमातून चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपुर, बोधलकसा, ताडोबा, महाबळेश्वर, पानशेत, शिर्डी, भंडरदरा, हरिहरेश्वर, कुणकेश्वर येथील उपहारगृहे महामंडळाने सुरु केली होती. त्याचबरोबर तारकर्ली येथील उपहारगृह 30 रोजी सुरु करण्यात येणार आहे. हे उपहारगृह यापूर्वी खाजगी व्यक्तिकडे चालविण्यास दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातिक मालवण तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवास केंद्र जगप्रसिद्ध आहे. तेथे उत्तम व्यवसाय होतो. येथे यापूर्वी कोकण हाऊस एसी, नॉन एसी, कोकणी हाऊस प्रीमियम सी व्ह्यु, नॉन सी व्ह्यु, बांबू बोट हाऊस सी व्ह्यु, नॉन सी व्ह्यु, डॉरमेंटरी या निवासाच्या सुविधा महामंडळाने यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता महामंडळ स्वतः उपहारगृह सुरु करीत आहे. या उपहार गृहात स्थानिक पदार्थ, भोजन देण्यात येणार असून यासाठी स्थानिक स्वयंपाकी नियुक्त करण्यात येणार आहे. परिणामी स्थानिकांना रोजगार प्राप्त होणार आहे, असे यावेळी जगदीश चव्हाण यांनी सांगितले.

फोटो:-

3

4