राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर…

2

ओरोस ता,२९: 
१० व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वकृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदार दिन कार्यक्रमात या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, रोहिणी रजपूत आदी उपस्थित होते.
वकृत्व स्पर्धेतील वरिष्ठ गटात ऐश्वर्या पंढरीनाथ मोर्ये (श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), प्रियांका प्रकाश वाडेकर (आनंदीबाई रावराणे कला, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वैभववाडी), कनिष्ठ गटात गायत्री प्रमोद खानोलकर (शिवराज मराठा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय साळगाव), मनीषा धोंडू शिंदे (पाटकर हायस्कूल वेंगुर्ला), कामाक्षी लक्ष्मण महालकर (दोडामार्ग), सुनील गणेश बाकरे (कणकवली कॉलेज कणकवली).
निबंध स्पर्धेतील वरिष्ठ गटात अनुजा यशवंत कुडतरकर (श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), अक्षय काशीराम सुतार (आनंदीबाई रावराणे कला, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वैभववाडी). कनिष्ठ गट मृणाली महेंद्र बिडये (शिवराज मराठा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय साळगाव, अनघा श्रीगुरु प्रभुसाळगांवकर (बी एम गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा) अस्मिता प्रकाश तेली (कणकवली कॉलेज), महिमा आत्माराम गवस (दोडामार्ग), समृद्धि भालचंद्र डिचवलकर (टोपीवाला ज्युनिअर कॉलेज मालवण). ईशा गंगाराम झोरे (आरएसबी सावंतवाडी)
चित्रकला स्पर्धेतील वरिष्ठ गटात प्रेम सुरेश चोडणकर (श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), प्रियांका प्रकाश वाडेकर (आनंदीबाई कला, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वैभववाडी). कनिष्ठ गटात सचित महादेव कांदेकर (शिवराज मराठा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय साळगाव) पूजा मधुकर मुंज (कणकवली कॉलेज), प्रणव रविंद्र मालवणकर (वेंगुर्ला कॉलेज), नुपुर शिवराम दळवी (दोडामार्ग), मेघनाथ सौगंधराज बादेकर (भंडारी ज्युनिअर कॉलेज मालवण), श्रेया विजय गांवकर (मदर क्वीन इंग्लिश स्कुल).
रांगोळी स्पर्धेतील वरिष्ठ गटात सुखदा श्रीकृष्ण पई (श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), गायत्री रामचंद्र जोशी (शिवराज मराठा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय साळगाव), विशाखा रामचंद्र ओवळीयेकर (कणकवली कॉलेज), मिलन महादेव नाईक (लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वेंगुर्ला), सुनिधी नारायण येरम (शिवराज मराठा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय साळगाव) कनिष्ठ गटात कस्तूरी सचिन खानविलकर (छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय नेर्ले-तिरवडे-वैभववाडी), साक्षी बाळकृष्ण पास्ते (आर एस बी हायस्कूल सावंतवाडी). अशाप्रकारे निकाल लागला असून या मुलांना गौरविण्यात आले आहे.

 

8

4