महिलांसाठी बचतगट, व्यवसाय गट महिला कमिट्या हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राधान्य…

2

प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर : वेंगुर्लेत महिलांशी साधला संवाद

वेंगुर्ले: ता.२९
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिलांसाठी बचतगट, व्यवसाय गट महिला कमिट्या यांना प्राधान्य देण्यात येत असून बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला जीएसटी मधून वगळण्यात यावे हे राष्ट्रवादीच्या शपथनाम्यातील वाचन पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वेंगुर्ले येथे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्या असता वेंगुर्ला महिला काथ्या कारखाना याठिकाणी जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी आपल्या रोजगार निमिर्तीबाबत विविध प्रश्न सौ चाकणकर यांच्यासमोर मांडल्या. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम के गावडे तसेच महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत, पुंडलिक दळवी, पं स सदस्य साक्षी कुबल, राष्ट्रवादी महिला वेंगुर्ला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, देवगड तालुकाध्यक्ष नैना आचरेकर, कणकवली तालुकाध्यक्ष स्नेहल पातडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ निर्मल, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मनीषा गवस, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, मकरंद परब, रोहन वराडकर, वामन कांबळे यांच्यासहित महिला उपस्थित होत्या.
यावेळी सौ चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या की संपूर्ण राज्याच्या दौऱयांवर असताना गेल्या पाच दिवसापासून आपण कोकण दौरा करत आहे. या दौऱ्यात महिला संघटनेचे पदाधिकारी तसेच महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा घेण्यात आला आहे.
महिला वर्गासाठी उज्वला गॅस योजना जरी मिळाली असली तरी कष्टकरी व शेतकरी हा वर्ग याठिकाणी मोठ्याप्रमाणात असल्यामुळे त्यांना धान्य व केरोसीन पुरवठा अत्यंत आवश्याक आहे. मागील सरकारच्या काळामध्ये हे धोरण राबवत असताना निश्चितच या महिलांवर अन्याय झाला आहे. याबाबत आपण नुकताच अन्न व पुरवठा मंत्री यांच्याशी संपर्क साधला असून या भागातील महिलांचे प्रश्न त्यांना सांगितले आहेत. येत्या दोन दिवसात हा दौऱ्या संपल्यानंतर संबंधीत मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करून या भागातील महिलांचा धान्य व केरीसीन बाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

1

4