विजय शिंदे; ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगीना आश्वासन…
दोडामार्ग ता.२९: तालुक्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या क्रीडांगणांचा आराखडा व अंदाजपत्रकाचे काम दोन महीन्यात पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा करण्यात येईल,असे आश्वासन क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिल्यानंतर साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी यांनी पुकारलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले.
दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी भ्रमणध्वनीवरुन मैदानासाठी लागणारा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.
या उपोषणास सरपंच लखु खरवत, उपसरपंच सुर्यकांत धणे, सदस्य रामचंद्र भिसे, शोभना जुवेकर, जेनिफर लोबो, नामदेव राणे, प्रकाश कदम, लक्ष्मी धणे, प्रमिला धणे, सुजाता नाईक, प्रिया परिट, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, माजी सरपंच गोपाळ गवस, सरपंच सेवासंघ तालुकाध्यक्ष प्रविण गवस, तेरवण -मेढे
सरपंच प्रियांका सोनवलकर, परमे सरपंच आनंद नाईक, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, युवासेना तालुकाप्रमुख भिवा गवस, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपसभापती राजु निंबाळकर, कबड्डी असोशिएशन
अध्यक्ष सुचन कोरगांवकर, सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंट्री असोशिएशन अध्यक्ष जय भोसले, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष प्रभाकर धुरी आदींसह शिक्षक संघटना प्रतिनिधी शिक्षक, मुख्याध्यापक, साटेली – भेडशी ग्रामस्थ, व्यापारी तालुक्यातील खेळाडु वर्ग यांनी उपोषणाला उपस्थिती दर्शवित पाठींबा दिला.