2

सोसाट्याच्या वाऱ्याचा परिणाम ; नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण…

मालवण, ता. २९ : चिवला बीच समोरच्या समुद्रातील ‘कवडा रॉक’ बेटावर मौजमजेस गेलेले २२ युवक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेटावर अडकून पडल्याचा प्रकार घडला आहे. रात्री उशिरा याबाबतची माहिती मिळाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या युवकांच्या नौका मागे फिरण्यास अडचण निर्माण होत असल्याचे कळते. परिणामी संबंधित युवकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
चिवला बीच समुद्रातील कवडा रॉक हे बेट पर्यटनासाठी विकसित होत आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील मधील पर्यटन व्यवसायिकांसह एकूण २२ युवक पार्टी करण्यासाठी रॉकवर होडीने गेले होते. मात्र सायंकाळी उशिरा ते माघारी फिरण्याचा प्रयत्न करत असताना वाऱ्यामुळे त्यांची बोट बेटावर लागण्यात अडचण निर्माण झाली. उशिरा पर्यंत हे युवक बेटावर अडकून पडले होते. आता वाऱ्याचा जोर कमी होईपर्यंत त्यांना बेटावरच वास्तव्य करावे लागणार आहे. या साऱ्या प्रकारामुळे मौजमजा करणे या युवकांच्या चांगलेच अंगलट आले असल्याचे बोलले जात आहे.

6

4