आरोग्यप्रश्नी नुसता दिखाऊपणा नको, तर.. प्रत्यक्षात काम करा…

2

आशिष सुभेदार; राष्ट्रवादीच्या पक्ष निरिक्षक अर्चना घारे यांच्या आंदोलनाला टोला

सावंतवाडी ता.३०: महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पक्ष निरीक्षक अर्चना घारे यांनी नुसती आरोग्य प्रश्नासंदर्भात आंदोलनाची भाषा करू नये,तर त्याचा पाठपुरावा करावा,त्यांनी तसे केले तर मनसे नक्कीच स्वागत करेल,असा टोला आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी लगावला.मनसेने या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची सेवा सुधारण्यासाठी वारवार आंदोलने,उपोषणे केली होती.त्यामुळे केवळ दिखाऊपणा न करता सौ.घारे यांनी याबाबतचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करावा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील पर्णकुटी विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी संतोष भैरवकर उपस्थित होते.

7

4