सिंधुदुर्गातील शेकडो कार्यकर्ते जाणार…
कणकवली, ता.30: बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अनेक घुसखोर देशात वास्तव्यात आहेत. त्यांना हुसकावून लावावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात ९ फेब्रुवारीला महामोर्चा निघणार आहे. यात सिंधुदुर्गातून शेकडो मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. तर मोर्चाच्या नियोजनाची बैठक १ फेबु्रवारीला कणकवलीत होणार असल्याचे ते म्हणाले.
मनसेचा केंद्राच्या एनआरसी आणि सीएएए या कायद्यांना पाठिंबा नाही. मात्र अवैधपणे राहणार्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशींच्या वास्तव्याला आमचा विरोध आहे. तसेच पाकिस्तान, बांगलादेशी नागरिकांचे समर्थन करणार्यांनाही मनसेचा विरोध आहे. त्यासाठीच मनसेचा अतिभव्य मोर्चा मुंबईत ९ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सिंधुदुर्गातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक कणकवलीतील मनसे कार्यालयात १ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती श्री.उपरकर यांनी दिली.