नांदोस येथे जुगारावर पोलिसांची धाड…

2

पाठलाग करत पाच संशयितांना पकडले ; २५ हजाराचे साहित्य जप्त…

मालवण, ता. ३० : तालुक्यातील नांदोस येथील गावडे यांच्या बागेत सुरू असलेल्या जुगारावर मालवण पोलिसांनी काल सायंकाळी उशिरा धाड टाकली. यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित पाचही जणांना पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत पकडले. संशयितांकडून रोख ३ हजार ७३० रुपये व दोन दुचाकी असा एकूण २४ हजार ७३० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. संशयित आरोपींना ४१ (अ) नुसार नोटीस बजावून सोडून देण्यात आले.
नांदोस येथील गावडे यांच्या बागेत जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भारत फारणे, रमेश तावडे, प्रसाद आचरेकर, मंगेश माने, प्रतीक जाधव, योगेश सराफदार यांच्या पथकाने काल सायंकाळी उशिरा नांदोस येथे अचानक धाड टाकली. यावेळी संशयित आरोपी रामचंद्र अर्जुन निकम वय-४९ रा. वराड कुसरवेवाडी, संतोष शशिकांत सावंत वय-४६ रा. वराड कुसरवेवाडी, पांडुरंग आनंद पाटकर वय-४४ रा. नांदोस गावठणवाडी, विजय हरी गावडे वय-५२ रा. नांदोस गावठणवाडी, सुहास विठ्ठल भोजने रा. पेंडूर हॉस्पिटलच्या मागे हे पाचजण रिंगण घालत जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिस आल्याचे दिसताच या पाचही जणांनी विविध दिशेने पळ काढला. मात्र पोलिसांच्या पथकातील सर्व कर्मचार्‍यांनी या पाचही जणांना पाठलाग करत त्यांना पकडले. त्यांच्याकडील रोख ३ हजार ७३० रुपये, एम. एच. ०७ यु-००३८, एम. एच. ०७ के-५२७ या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयितांना ४१ (अ) नुसार कारवाई करत नोटीस बजावून सोडण्यात आले.

2

4