मौदे येथील घटना; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
वैभववाडी.ता,३०: मारहाणीत जखमी झालेल्या मौंदे येथील तरुणाचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात बुधवारी दुपारी मृत्यू झाला. दत्ताराम परशुराम मोरे वय ३४ वर्षे रा. मौंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मयत दत्ताराम मोरे यांच्या आईने दिलेल्या माहीतीनुसार, रविवारी २६ जानेवारी रोजी हेतशेवरी फाटा येथे केस कापण्यासाठी गेला होता. त्याला दारु पिण्याची सवय होती. सायंकाळी शेवरीफाटा येथे दोन इसमांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन दारुच्या बाटल्या काढून घेतल्या. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. यातून त्याला गंभीर माराहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकी गाडीतून उपळेची खिंड येथे टाकून मारेकरी तिथून पसार झाले. जखमी अवस्थेत मयत मोरे तेथे बेशुद्ध अवस्थेत पडून होता. पहाटे त्याला जाग आल्यानंतर तो शेवरी फाट्यावर आला. तिथे पाणी पिऊन तो पैसे नसल्यामुळे कसाबसा चालत घरी मौंदे येथे आला. घरी आल्यानंतर त्यांने घडलेला प्रकार आईला सांगितला.त्याला उपचारासाठी वैभववाडी येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांनी त्याला अधिक उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. कुटुंबियांनी त्याला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मौंदे गावावर शोककळा पसरली होती. रात्री उशीरा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, त्याला माराहाण करणाऱ्यांवर गुन्हा नोंद होत नाही. तोपर्यंत मृतदेहावर अत्यसंस्कार करणार नाही. अशी आक्रमक भूमिका कुटुंबीय व संपूर्ण गावक-यांनी घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. कुटुंबिय व ग्रामस्थांनी मारहाणा करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करा. असा आग्रह धरला होता. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.