दीपक केसरकर; तालुका क्रीडा समितीच्या बैठकीत माहिती…
दोडामार्ग ता.३०: येथे होणाऱ्या तालुका क्रीडासंकुलासाठी ४ कोटी ४७ लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे.अशी माहिती आमदार तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.येथील क्रीडा संकुल समिती विषयासंदर्भातील बैठक आज श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी तालुकास्तरीय मैदानाला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यास दिरंगाई होत असल्याने साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी आणि सहकारी यांनी या विरोधात नियोजित मैदानावर उपोषण केले होते.त्यावेळी आमदार तथा अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल दोडामार्ग यांच्याशी अंदाजपत्रक व आराखडा यावर चर्चा करून त्यास मान्यता दिल्याचे पत्र देऊ उपोषण मागे घेण्यात आले होते.यावेळी पुढील कार्यवाहीची बैठक दोडामार्ग तहसीलदार येथे ३० जानेवारी आयोजित करण्याचे ठरले होते.त्यानुसार गुरुवारी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी क्रीडासंकुलासाठी ४ कोटी ४७ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध होणार अशी माहिती श्री केसरकर यांनी दिली.यातील २ कोटी ५७लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे तसेच मैदानासाठीच्या प्रशासकीय इमारत ,बोवरवेल ,स्प्रिंकल्स ,गवत आच्छादन (लॉन) इतर आवश्यक संकुले या बाबी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या.
यावेळी तहसीलदार मोरेश्वर हाडके, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, आर्किटेक्ट इंजिनिअर सोहेल बागवान ,क्रीडा लिपिक स्वप्नील देवळेकर ,पोलिस निरीक्षक सुनील थोपटे ,गटविकास अधिकारी मिलींद जाधव , शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस ,तालुकसंघटक संजय गवस,ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी आदी उपस्थित होते.