मालवण, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत तत्कालीन समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या सहकार्याने रेवंडी ग्रामपंचायतीतील दिव्यांग कर्मचारी समीर कांबळी याला स्कूटर सुपूर्द करण्यात आली.
यासाठी जिल्हा परिषद सदस्या सरोज परब, रेवंडी सरपंच प्रिया कांबळी यांनी प्रयत्न केले. यावेळी उपसरपंच श्यामसुंदर तळाशीलकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज कांबळी, जान्हवी कांबळी, प्रज्वला चेंदवणकर, गुलाब कांबळी, सुषमा मयेकर, कृतिका कांबळी, लक्ष्मण रेवंडकर, प्रकाश कांबळी, नरेश करलकर, मिलिंद कांबळी, गौरव करलकर, प्रथमेश करलकर, विजय कांबळी, श्रावणी कांबळी यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.