सावंतवाडीत भाजपाचे पदाधिकारी विनायक ठाकूर यांच्या घरात चोरी

2

सावंतवाडी ता.३०:येथील भाजपचे पदाधिकारी विनायक ठाकूर यांच्या फ्लॅट मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.हा प्रकार आज रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास उघड झाला.ही घटना लक्ष्मीनगर दत्त रेसिडन्सी येथे घडली.घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.
अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.तत्पूर्वी वीज कनेक्शन तोडल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.याबाबत पोलिसांना त्यांनी खबर दिली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

3

4