Wednesday, May 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedसिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची मासिक सहविचा १ फेब्रुवारीला...

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची मासिक सहविचा १ फेब्रुवारीला…

बांदा ता.३१:
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या मासिक सहविचार सभेचे आयोजन शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सभागृहात आयोजन करण्यात आली आहे.
या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सभासद वर्गणी बाबत विचार विनिमय करणे, जिल्हा मेळावा आयोजन करण्यासाठी विचारविनिमय करून तारीख व वेळ निश्चित करणे, रत्नागिरी येथे झालेल्या विभागीय सभेचा सभावृत्तांत सांगून पुढील दिशा ठरविणे, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर विचारविनिमय करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत.
सर्व जिल्हा पदाधिकारी, फेडरेशन प्रतिनिधी, महिला आघाडी प्रमुख, कार्यकारणी सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष व कार्यवाह यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर व कार्यवाह पांडुरंग काळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments