इन्सुली माऊली मंदिरातील फंडपेटी चोरून रोकड लंपास…

2

बांदा.ता,३१: इन्सुली-परबवाडी येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने गुरूवारी मध्यरात्री चोरून नेली. यात सुमारे २ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद देवस्थान मानकरी रामा दत्ताराम परब यांनी बांदा पोलीसांत दिली आहे. मंदिर परिसरात शोध घेऊनही फंडपेटी आढळून आली नाही. पोलीस कर्मचारी संजय हुंबे व अमोल बंडगर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बांदा पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. भरवस्तीलगत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

3

4